शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींनी सुसाईड नोट नष्ट केली का? गुन्हे शाखा करणार तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 04:31 IST

पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिघींच्या ताब्यासाठी उच्च न्यायालयात धाव

मुंबई : डॉ. पायल तडवी हीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती का? लिहिली असल्यास आरोपींनी ती नष्ट केली का? या अंगाने तपास करण्यासाठी गुन्हे शाखेला तिन्ही आरोपींचा ताबा हवा आहे. त्यासाठी गुन्हे शाखेने आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती उच्च न्यायालयाला याचिकेव्दारे केली आहे. केली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी आहे.

गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयाने आरोपी डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. २२ मे रोजी पायल तडवीने तिच्या हॉस्टेलवर आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना आहुजा, मेहरे आणि खंडेलवाल यांना अटक केली. तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा या तिघींवर नोंदविण्यात आला आहे. जातीवाचक टिप्पणी करून या तिघींनी पायलचा छळ केल्याचा आरोप पायलच्या आईने केला आहे. त्यानंतर या तिघींवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा व रॅगिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तडवीच्या आत्महत्याप्रकरणानंतर अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याच दिवशी या प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे आरोपींची चौकशी करण्याची संधी मिळाली नाही, असे गुन्हे शाखेने याचिकेत म्हटले आहे.विशेष न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याच्या निर्णयाला विरोध करत गुन्हे शाखेने आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. अधिक चौकशी करण्यासाठी आरोपींचा ताबा हवा असल्याचे गुन्हे शाखेने याचिकेत म्हटले आहे.

आरोपींचा जामिनासाठी अर्जआहुजा, मेहरे आणि खंडेलवाल यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाने या तिघींच्या जामीन अर्जावरील सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे. तडवीवर आपण कधीही जातीवेचक टिपणी केली नाही. मुळातच तिची जात आपल्याला माहीत नव्हती, असे आरोपींनी जामीन अर्जात म्हटले आहे. तडवी दिलेले काम नीट करत नव्हती. त्यावरून तिची टर उडवायचो. तिचा छळ केला नाही, असा दावा आरोपींनी केला आहे.