शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त एसीपीची विकासकाने केली २५ लाखांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:50 IST

घरासाठी रिकामा केला सर्व्हिस फंड : बोरीवली पोलिसांत गुन्हा दाखल

गौरी टेंबकर - कलगुटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्तांनी घरासाठी सर्व्हिस फंड रिकामा करत बिल्डरला २५ लाख रुपये दिले. मात्र गेली दोन वर्षे हे पैसे वापरत त्याने या पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली. यामुळे हवालदिल झालेल्या निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्तांनी अखेर पोलीस आयुक्तांची भेट घेत बोरीवली पोलीस ठाण्यात सुदामा ग्रुप आॅफ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचा मालक प्रवीण वृंदावनदास वोरा आणि त्याचा पार्टनर स्नेहलभाई मंडेलिया यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

प्रकाश रामगुडे (६६) असे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. २०१३ साली साहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांचा मुलगा योगेश पालिकेत अभियंता आहे. भार्इंदरच्या सुदामा गु्रप आॅफ बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचा बिल्डर वोरा याच्याशी रामगुडे यांची ओळख मे, २०१८ मध्ये इस्टेट एजंट दिलीप गुजरमार्फत झाली. बोरीवलीच्या क्रेस्ट रॉयल अपार्टमेंटमधील फ्लॅट पार्किंगसह १ कोटी ७० लाख रुपयांत घेण्याचे रामगुडे यांनी नक्की केले. तसेच त्यांच्या फंडातील २५ लाख रुपये आरटीजीएसने वोराच्या आयडीबीआय बँक खात्यात पाठवले. मात्र याची पावती वोराने त्यांना दिलीच नाही. रामगुडेंना तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा करणे शक्य न झाल्याने त्यांनी फ्लॅट घेण्याचे रद्द करत वोराकडे २५ लाख रुपये परत मागितले. मात्र फ्लॅट विकला गेल्यानंतरच २५ लाखांपैकी ५ लाख रुपये कापून उर्वरित रक्कम परत करेन, असे एजंट गुजरमार्फत रामगुडे यांना वोराने कळविले आणि त्यांनी या प्रकरणी बोरीवली पोलिसात लेखी तक्रार दिली. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निर्देशानंतर बोरीवली पोलीस ठाण्यात वोरा आणि त्याच्या पार्टनरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत विचारणा करण्यासाठी वोरा याला ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला तेव्हा ‘बाद मे फोन करता हू’ असे म्हणत त्याने फोन कट केला आणि बरेच फोन तसेच मेसेज केल्यानंतरही त्याने काहीच उत्तर दिले नाही. रामगुडे यांनी वोराला पैसे दिल्याचे उघड झाले असून ते नेमके कोणत्या कारणासाठी देण्यात आलेत याबाबत चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद घाग यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी