शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’ घोटाळा प्रकरण : धारणी पोलिसांत दोन तक्रारीनंतरही फौजदारी नाही, एसआयटीने पुरविले कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:27 IST

आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये झालेला अपहार, घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा शिरस्ता सुरू आहे.

अमरावती : आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये झालेला अपहार, घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा शिरस्ता सुरू आहे. मात्र, धारणी पोलिसांत माजी प्रकल्प अधिकारी रमेश मांजरीकर यांच्याविरूद्ध दोन तक्रारी देऊनही फौजदारी दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून जणू दोषींना अभय मिळत असल्याचे वास्तव आहे.        ‘ट्रायबल’ घोटाळ्यातील दोषींना कठोर शासन व्हावे, यासाठी माजी न्या. गायकवाड समितीच्या शिफारसीनुसार पोलिसांत तक्रारी नोदविल्या जात आहे. दोषींवर कारवाई करून घोटाळ्याचे पायमुळे निखंदून काढण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा माजी न्यायमूर्ती करंदीकर समिती गठित केली. त्याकरिता विशेष चौकशी पथक नेमले आहे. एसआयटीच्या पुढाकाराने ‘ट्रायबल’ घोटाळ्यातील दोषींविरूद्ध तक्रार दाखल करून पोलिसात फौजदारीचे सत्र सुरू आहे. त्यानुसार धारणी प्रकल्प कार्यालयाचे तक्रार अधिकारी शिवानंद पेढेकर यांनी एसआयटीने सादर केलेल्या यादीनुसार माजी प्रकल्प अधिकारी रमेश माजंरीकर यांच्या विरुद्ध पोलिसांत अपहार झाल्याप्रकरणी जुलै महिन्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांना आवश्यक कागदपत्रेदेखील १० आॅगस्टपूर्वीच सादर केली. मात्र, अद्यापही धारणी पोलिसांनी फौजदारी दाखल केली नाही. तर, दुसरीकडे धारणीचे माजी प्रकल्प अधिकारी मांजरीकर यांनी पोलिसात तक्रार होताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतल्याची माहिती आहे. रमेश मांजरीकर यांच्याविरूद्ध १० लाख रूपयांचे बोगस प्रशिक्षण आणि २५ लाखांचे पाईप वाटपात अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. धारणी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पोलिसांकडून एकाच फिर्यादीत कारवाई होत नसल्याने हतबल झाले आहे. मात्र, एसआयटीकडून अन्य दोषींची यादी आल्यास या घोटाळ्यातील अन्य दोषींवर कशी, केव्हा कारवाई होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणेदार बदलीने कारवाईला ब्रेकधारणीचे ठाणेदार लहुजी मोहनडुले यांची बदली झाली. त्यांच्या जागी धारणीचे नवे ठाणेदार विलास कुळकर्णी हे आले आहेत. नव्या ठाणेदारांकडून आदिवासी विकास विभागाच्या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. मात्र, ठाणेदार बदलल्यामुळे अद्यापही घोटाळ्यातील दोषींविरूद् तक्रार नोंदविली असताना फौजदारी दाखल करण्यात आली नाही, हे विशेष.

 आदिवासी विकास विभागाच्या घोटाळाप्रकरणी शासनस्तरावरून दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्यासाठी दबाव येत आहे. धारणी पोलिसात रमेश मांजरीकर यांच्या नावे वेगवेगळ्या दोन तक्रारी देण्यात आल्या असून,अद्यापही एफआयआर नोंदविण्यात आले नाही.        - शिवानंद पेढेकर,      सहायक प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Amravatiअमरावती