शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी मित्रांनी लुटले व्यापाऱ्याला; नऊ जण अटकेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 23:44 IST

दरोड्याचा उलगडा : वालीव पाेलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : वसईजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर २६ फेब्रुवारीला संध्याकाळी मुंबईतील व्यापाऱ्याला दराेडेखाेरांनी लुटून २५ लाखांच्या रकमेसह पळ काढल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट नंबर ३ ने या गुन्ह्याचा उलगडा करून नऊ दरोडेखोरांना अटक केली आहे. डाेक्यावर कर्ज झाल्याने दाेन मित्रांनी या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचल्याचा उलगडा झाला आहे. आरोपींकडून ६ ते ७ लाखांची रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.व्यापारी अरिहंत पाबुवाल यांचे मित्र पार्थ जितेंद्र जानी (२६) आणि रब्बानी मेहबूब परेल (२८) या दोघांवर कर्ज असल्याने हा दरोड्याचा प्लान आखण्यात आला होता. या दोघांना वालीव येथून ताब्यात घेतल्यानंतर दोघांचे वागणे, बोलणे यात तफावत जाणवत असल्याने संशय आल्यावर दोघांची कसून चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली देऊन सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अजमेर येथून गिरीश वालेचा उर्फ मनोहरलाल पटेल (२७) आणि अब्दुल हमीद अहमद सय्यद (35) यांना मंगळवारी पकडून वसईत आणले. ठाणे येथील राहणारे इम्रान अहमद शेख (३८), स्मितेश सुभाष गवस (३७), सुरेश गुणाजी दळवी (३३), संतोष गोविंद मोरे (४४) आणि विनय संतोष सिंग (४१) यांना बुधवारी अटक करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. हे पाचही आरोपी आर्थिक संकट व कर्जामुळे अब्दुल हमीद अहमद सय्यद याच्या सांगण्यामुळे गुन्ह्यात सहभागी झाले. मुंबईच्या अंधेरी येथील सहार रोडवरील हयात रेजन्सीमध्ये राहणारे व्यापारी अरिहंत अमित पाबुवाल (२७) हे कोविड साथीच्या अनुषंगाने कोविड साहित्य खरेदी करण्यासाठी  तीन ते चार दिवसांपासून आरोपी मनोहरलाल पटेल यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्कात होते. 

शुक्रवारी व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अजमेरवरून दोन, वालीव येथून दोन आणि ठाण्यावरून पाच अशा एकूण नऊ दरोडेखोरांना पकडले आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का, याचाही शोध घेत तपास करत आहे. आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी वसई न्यायालयाने सुनावली आहे.- प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३