शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:42 IST

उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलिसांना हेल्दी बनवायचेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये नागपुरातील गुन्हेगारी आणि पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत ठेवला. यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर उपस्थित होते.डॉ. उपाध्याय म्हणाले, उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यात आणि गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले आहे. शहरातील ‘टॉप - २०’ गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांना कारागृहात डांबले. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनी बाहेर पळ काढावा लागला आहे. यापुढे गुन्हेगारी नियंत्रणासोबतच हेल्दी पुलिसिंगवरही भर देण्याला आपण भर देणार असल्याचे ते म्हणाले.मोक्का कारवाईत राज्यात नागपूर पोलिसांनी ‘नंबर वन' स्थान मिळवले. गंभीर स्वरूपाचे वारंवार संघटीतपणे गुन्हेकरणा-या कुख्यात गुंडांच्या तब्बल १३ टोळ्यांविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली. त्यातून ६५ कुख्यात गुंडांवर लगाम कसण्यात आला. तडीपारी, मपीडीएच्या कारवाईमध्येही वाढ करण्यात आली. एमपीडीए अंतर्गत ३३ गुंडांना मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील सर्वच मोठे आणि कुख्यात गुंड सध्या कारागृहात पडले आहेत. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी, प्राणांतिक अपघात अशा गुन्ह्यांसह बलात्कार, विनयभंग, खंडणी वसुली तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ८६३ गुन्हे कमी घडले. हा धडाका यापुढेही सुरूच राहिल, असे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.बंदूक अन् बुलेटपत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उपराजधानीत शस्त्रांची तस्करीसंबंधीचे गुन्हे वाढल्याचे मान्य केले. ते कमी करण्यासाठी गुन्हे शाखेने प्रयत्न चालविले असून, गतवर्षी ३१ गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. ज्यात ४१ आरोपींना बंदुकीसह अटक केली. तसेच ३४ पिस्तूल आणि ५२ काडतूस पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले. जप्त केलेल्या अग्निशस्त्रांमध्ये सर्वाधिक १७ विदेशी बनावटीचे पिस्तूल, १० देशी कट्टे, २ माऊजर, २ रायफल आणि ३ रिव्हॉल्वरचा समावेश आहे. शहरात अग्निशस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष योजना आखल्याचेही त्यांनी सांगितले.हेल्थ कार्ड देणार !कामाचा ताण आणि सततची दगदग यामुळे पोलिसांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना गंभीर व्याधी होतात. ते ध्यानात आल्यामुळेशहरात कार्यरत एएसआय ते शिपाईपदापर्यंतच्या सर्व पोलिसांची यापुढे नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना हेल्थ कार्डदेण्यात येईल. त्यांची अ, ब, क,अशी विभागणी करण्यात येणार आहे. अ गटात निरोगी, ब गटात मधुमेह ,उच्चरक्तदाब तर क गटात हृदयविकार असलेल्या पोलिसांचा समावेश करण्यात येईल. ब आणि क गटात समावेश असलेल्या कर्मचा-यांची यादी पोली मुख्यालय, नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाण्यात लावण्यात येईल. क गटात असलेल्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येऊन त्यांना बंदोबस्त अथवा तणाव असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात येणार नाही. या कर्मचा-यांना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामासाठी तैनात करण्यात येईल. पोलिसांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठीही विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्यायाम, योगा, समुपदेशन करूनही त्यांच्या आरोग्याला जपण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.लाचखोरीच्या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना आयुक्तांनी कडक कारवाईचे सुतोवाच केले. लाचखोर, डिफॉल्टर पोलिसांना धडा शिकविल्याची उदाहरणेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितली. गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, विधी अधिका-यांकडे प्रकरण असल्याचे सांगून टाळाटाळ करण्यासह वादग्रस्त ठाणेदारांच्या कार्यशैलीचेही अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी हमी डॉ. उपाध्याय यांनी दिली.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयMediaमाध्यमे