शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पुत्राने धमकावल्याची व्यावसायिकाची तक्रार; दोन लाख रुपये हप्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 04:10 IST

विकास गोगावलेवर मरिन लाईन्स पोलिसांत गुन्हा

महाड : महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्याकडे प्रतिमहिना दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार मुंबईतील एका वाहतूक व्यावसायिकाने केली आहे. ही खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आमदारपुत्र तथा दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी धमकाविल्याची तक्रार मुंबईतील मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने केली आहे. या प्रकरणी विकास गोगावले यांच्याविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये उभे असलेले या व्यावसायिकाचे दोन कंटेनर फोडून चालकांकडील रोख रक्कम आणि मोबाइल लंपास करण्यात आले. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दहा ते बारा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

भांडुप येथील राजेश शेटकर यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. शेटकर यांची राजेश कार्गो अँड मुव्हर्स प्रा. लि. ही वाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे कंटेनर न्हावा शेवा ते महाड एमआयडीसी अशी वाहतूक करतात. काही दिवसांपूर्वी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले. मात्र, शेटकर भेटण्यासाठी गेले नाहीत. मंगळवारी विकास गोगावले यांनी त्यांना फोन करून दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. शेटकर भेटायला गेल्यानंतर निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे दरमहा मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विकास यांनी केली. राजेशनी असमर्थता दर्शविल्यानंतर, विकास यांनी धमकी देत कंटेनर फोडून टाकू असा इशाराही दिला. त्यानंतर शेटकर हे हॉटेलमधून बाहेर पडताच, महाड एमआयडीसीत त्यांच्या दोन कंटेनरची तोडफोड केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर शेटकर यांनी मरिन ड्राइव्ह पोलीसांत याबाबत तक्रार केली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी विकास गोगावलेविरुद्ध धमकावण्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी भरत गोगावले यांची बाजू समजून घेण्यासाठी फोन केला, मात्र तो स्वीच ऑफ होता.

१० ते १२ जणांवर गुन्हामहाडमध्ये, बुधवारी रात्री ११.४०च्या सुमारास शेटकर यांच्या राजेश कार्गो ट्रान्सपोर्टचे एमएच ४६, ३२४१ आणि एमएच ४६एआर-३४६३ हे दोन कंटेनर महाड एमआयडीसीतील अ‍ॅक्वा फार्मा या कंपनीतून रसायन घेऊन न्हावा शेवा बंदराकडे जात असताना दहा ते बारा जणांनी बिरवाडी टाकीकोंड येथे कंटेनर थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही कंटेनरच्या काचा फोडल्या. यापैकी एक कंटेनरचा चालक सूर्यनाथ चौधरीला मारहाण करण्यात आली आणि दुसरा कंटेनरचालक सुभाषचंद्र जयस्वाल याच्या खिशातील साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणी सुभाषचंद्रने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला असला तरी गोगावले यांच्या इशाऱ्यामुळेच कंटेनरची तोडफोड केल्याचा आरोप राजेश शेटकर यांनी केल आहे.