शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

२४ लाखांचे कोकेन जप्त; आफ्रिकन नागरिकाला ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 07:22 IST

वागळे इस्टेट भागात धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्ल्स उर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून २४  लाख सहा हजारांचे ६० ग्रॅम कोकेनही जप्त केले आहे.

वागळे इस्टेट येथील हिंदुस्थान रेसिडेन्सी हॉटेल, येथे एक कृष्णवर्णीय व्यक्ती  कोकेन या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मिळाली होती. त्याआधारे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ३ ऑगस्टला रात्री पावणेनऊच्या सुमारास सापळा रचून रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट या देशातील नागरिक कोफी चार्ल्स उर्फ किंग याला  ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचा कोकेन हा अमली पदार्थ, एक मोबाइल, रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्टचा पासपोर्ट आणि व्हिसा असा २४ लाख सहा हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 ९ ऑगस्टपर्यंत  पोलीस कोठडी   चार्ल्स उर्फ किंग हा मूळचा आफ्रिकन देशातील  रहिवासी आहे. त्याने त्याच्या एका आफ्रिकन साथीदाराकडून खरेदी केलेल्या कोकेनची तस्करी करण्यासाठी तो ठाण्यात आला होता, अशी कबुलीही दिली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे  सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.