शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:15 IST

साक्री : खेळाडू, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरातील पांझराकान कॉलनीच्या प्रांगणात सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेच्या दुसºया टप्प्यास प्रारंभ झाला. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातून दोन हजार खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. हे जागरूक तालुक्याचे वैशिष्ट असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांनी उदघाटनप्रसंगी केले. तालुक्यातील २ हजार २०० खेळाडूंनी विविध खेळांच्या स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी केली. स्पर्धेच्या दुसºया टप्प्यास प्रारंभ झाला असून उदघाटनप्रसंगी जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, भाजयुमो तालुकाध्यक्ष डॉ.देवेंद्र देवरे, सरचिटणीस राजेंद्र खैरनार, विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.एल. तोरवणे, उभंडचे सरपंच संजय पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, साक्री तालुका विधायक समितीचे अध्यक्ष सुजन सोनवणे, मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे तालुका संयोजक जितेंद्र देसले, पं.स. सदस्य प्रा.युवराज काकुस्ते, गोरख बोराळे, स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हा संयोजक योगेश भामरे, राकेश अहिरराव, प्रशांत शिरसाठ, बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश संयोजिका डॉ.विजया अहिरराव, डॉ.मिनाक्षी शिंदे, राकेश दहिते आदी उपस्थित होते. दुसºया टप्प्यात क्रिकेट, कुस्ती  स्पर्धांसह रांगोळी, गायन, चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेसाठी ४५ संघांनी तर कुस्ती स्पर्धेसाठी १८ मल्लांनी सहभाग नोंदविला. सी.गो. पाटील महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर बेटी बचाव-बेटी पढाव  शीर्षकांतर्गत ३० विद्यार्थिनींनी रांगोळ्या साकारल्या. त्यांचे परीक्षण डॉ.रहाटकर, डॉ.शिंदे, गुलशन देसले, प्रा.उषा शेलार यांनी केले. चित्रकला व गीतगायन स्पर्धांसाठी सी.गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, प्रा.युवराज काकुस्ते, डॉ.देवेंद्र देवरे, जितेंद्र देसले, नंदलाल अहिरे  आदींनी नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा व थेट राज्यस्तरावर कौशल्याचा ठसा उमटविता येईल. अंतिम स्पर्धेनंतर प्रत्येक खेळ प्रकारातील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते बक्षिस प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी भाजयुमो तालुकाध्यक्ष डॉ.देवेंद्र देवरे, सी.एम. चषक संयोजक सुमित पाटील, अमोल सोनवणे, तेजस जयस्वाल आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे