शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला

By कुणाल गवाणकर | Updated: January 2, 2021 12:05 IST

पोलिसांकडून आई आणि तिच्या प्रियकराला अटक; पीडित मुलीनं दिला बाळाला जन्म

चेन्नई: माय-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार चेन्नईत घडला आहे. एका आईनं स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराची परवानगी दिली. त्यामुळे १५ वर्षीय मुलगी गरोदर राहिली. तिनं एका बाळाला जन्म दिला. यानंतर पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ३६ वर्षांची नंदिनी (नाव बदलण्यात आलं आहे) काही वर्षांपूर्वी पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर तिचे ३२ वर्षांच्या सेकरशी प्रेमसंबंध होते. शोलिनगानाल्लुरचा रहिवासी असलेला सेकर रंगारी काम करतो. नंदिनीला भेटण्यासाठी येणाऱ्या सेकरनं तिच्या १५ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. याची तक्रार मुलीनं नंदिनीकडे केली. त्यावर नंदिनीनं पीडित मुलीला सहकार्य कर, असा सल्ला दिला.सेकर करत असलेल्या बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नंदिनीनं तिला आपल्या भावाकडे पाठवलं. मुलगी गरोदर असल्याची माहिती तिनं भावाला दिली नाही. त्यानंतर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मामांना सांगितला. त्यानंतर त्यांनी नंदिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. नंदिनीचा शोध न लागल्यानं मामांनी मडीपक्कम येथील महिला पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत नंदिनी आणि सेकरवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलीला पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं. तिथं तिनं ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिला. नंदिनी आणि सेकरचा शोध घेणाऱ्या पोलिसांना डिसेंबरमध्ये मोठं यश मिळालं. ३० डिसेंबरला दोघांनाही अटक करण्यात आली. 

टॅग्स :Rapeबलात्कार