शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणे रिव्हॉल्व्हर वापरणं पडलं महागात, कारावासाची शिक्षा

By सागर दुबे | Updated: March 6, 2023 21:44 IST

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्ष सश्रम कारावास

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: स्वत:च्या ताब्यातील रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे वापरल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर (६५, रा. पिंप्री, ता. धरणगाव) यांना सोमवारी न्यायालयाने २ वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगा दीपक मोहकर याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांनी दिला आहे.

११ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्या वडीलांचे पिंप्री येथे निधन झाले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असताना विठ्ठल मोहकर यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन राउंड आकाशाकडे फायर केले होते. नंतर मुलगा दीपक याने त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर घेवून फायर करण्याचा प्रयत्न केला. गोळी अंत्ययात्रेतील जमलेल्या गर्दीमधील तुकाराम वना बडगुजर (६५, रा. पिंपळगाव हरेश्वर ) यांच्या छातील लागून ते मयत झाले होते. याप्रकरणी विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दीपक मोहकर यांच्याविरूध्द धरणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१४ साक्षीदार तपासले, ९ जण फितूर...

हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयासमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तलाठी अलताफ पठाण, तपास अधिकारी अंबादास मोरे, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, घटनेतील दाखल अंमलदार आनंदा शिंदे, एल.एच.गायकवाड यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. इतर ९ साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयाने साक्षीपुराव्याअंती भादंवि कलम ३०४ अ व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार विठ्ठल मोहकर यांना दोषी धरून शिक्षा सुनावली. तर त्यांचा मुलगा दीपक याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अशी सुनावली शिक्षा

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांना भादंवि कलम ३०४ अ नुसार २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपयांचा दंड तर भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हर्षवधन सपकाळे यांचे तर केसवॉच म्हणून विलास पाटील यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Arrestअटक