शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Breaking : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त 

By पूनम अपराज | Updated: February 14, 2021 14:30 IST

Explosive material recovered from Jammu bus stand : सध्या सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील.

ठळक मुद्देजम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे.

जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पुलवामाच्या भ्याड हल्ल्याच्या दोन वर्ष पूर्ण होत असून त्यापार्श्वभूमीवर दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते. सध्या सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील.

जम्मूमध्ये गर्दी असलेल्या सामान्य बसस्थानकाजवळ आज ७ किलोग्राम स्फोटकं(आयईडी) आढळले. जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील बारी ब्राह्मणा भागातील कुंजवाणी येथून पोलिसांनी दोन प्रमुख दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आयईडी जप्त करण्यात आला आहे. हे उपकरण विशिष्ट माहितीवरुन कार्य करताना आढळले होते, २०१९ च्या पुलवामा हल्ल्याला २ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर स्फोट घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.गेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांच्या आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या हत्येप्रकरणी वाँटेडअसलेल्या रेझिस्टंट फ्रंट (टीआरएफ) शी संबंधित एक दहशतवादी संघटनेचा दहशतवादी झहूर अहमद राथेर याला शनिवारी साम्बाच्या बारी ब्राह्मण भागात अटक करण्यात आली.याआधी ६ फेब्रुवारीला लष्कर-ए-मुस्तफा (एलईएम) चा सेल्फ स्टाईल कमांडर हिदायतुल्लाह मलिक उर्फ ​​"हसनैन" याला जम्मूच्या कुंजवाणी भागातून पकडण्यात आला होता, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. दोन वर्षांपूर्वी या दिवशी, पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ७० वाहनांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि ४० जवान शहीद झाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी