शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

बीकेसीत जीवघेणे स्टंट करणारा २४ वर्षीय फय्याज कादरी अखेर गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 06:24 IST

पोलिसांनी साकिनाक्यातून गाशा गुंडाळला, सोबत बसलेल्या दोन तरुणींची ओळख पटविण्याचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रेत बीकेसी परिसरात  मोटर सायकलवर दोन तरुणी आणि एक तरुण जीवघेणे स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्वतःचे लोकेशन बदलत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फय्याज अहमद अजीमुल्ला कादरी (२४) या चालकाला रविवारी साकीनाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्या सोबत बसलेल्या दोन तरुणींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

परिमंडळ ८ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कादरी हा वडाळ्याचा राहणारा असून त्याच्यावर यापूर्वी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात तसेच अँटॉप हिल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस त्याच्या मागावर असल्याने तो सतत त्याचा पत्ता बदलत होता. आम्ही त्याचा साकीनाका येथील सध्याचा पत्ता शोधून काढत त्याला अटक केल्याचे गेडाम यांनी सांगितले.

 काय आहे व्हिडीओत?

- मुंबईच्या रस्त्यावर केलेल्या धोकादायक बाईक स्टंटच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये कादरी त्याच्या समोर बसलेली मुलगी आणि मागे बसलेल्या दुसऱ्या मुलीसह भरधाव वेगात गाडी चालवतो.- या दरम्यान दुचाकीचे पुढचे चाक तो वर उचलत मागच्या चाकावर कित्येक मीटरपर्यंत गाडी पळवतो.  रायडरच्या मागे-पुढे बसलेल्या मुली हात हलवत, हसत असून तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नव्हते. - हा व्हिडीओ पॉथहोल वॉरियर्स फाउंडेशन नावाच्या ट्विटर पेजने शेअर केला होता. या ट्विटची दखल घेत वाहतूक पोलिसांनी बीकेसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :MumbaiमुंबईbikeबाईकArrestअटक