शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून मुद्देमाल पळविणारा भाजपाचा पदाधिकारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:58 IST

आरोपी प्रदीपकुमार तिवारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

वर्धा : धावत्या रेल्वेमध्ये टिसीसोबत वाद करून सोनसाखळीसह महागडा मोबाईल पळवून नेण्यात आला. वर्धा लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आपल्या हालचालिंना वेग देत सदर घटनेतील आरोपी प्रदीपकुमार सत्यनारायण तिवारी रा. लेदगाई जि. लातेहार झारखंड याला त्याच्या मुळ गावावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. आरोपी प्रदीपकुमार तिवारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपूर मध्ये रेल्वेमध्ये टिसी जितेंद्र दर्भे हे सिकंदराबाद-बरोणी स्पेशल एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. तर हैद्राबाद येथील आयोजित कार्यक्रम आटोपून प्रदीपकुमार तिवारी हेही याच रेल्वेने प्रवास करीत होते. जितेंद्र यांच्याशी भुगाव रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या रेल्वेत जागा आरक्षणाच्या कारणावरून प्रदीपकुमार तिवारी व त्यांच्या सहकार्यांनी वाद केला. तिवारी हे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी टिसी दर्भे यांच्या जवळील सोनसाखळी व महागडा मोबाईल हिसकावून यशस्वी पळ काढला. या घटनेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेवून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान वर्धा लोहमार्ग पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचे चित्रकरण तपासले. तसेच मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून आरोपीचा मागोवा घेतला.

दरम्यान, खात्रीदायक माहिती मिळताच वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या  चमुने वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात झारखंड राज्यातील लेदगाई गाठून प्रदीपकुमार तिवारी याला ताब्यात घेतले. विचारपूसदरम्याने त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीला न्यायालयात हजर करून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वर्धा लोहमार्ग पोलिसांनी मिळविली आहे. पुढील तपास सहाय्यक  पोलीस निरीक्षक नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल तडस करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटक