शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede: मोठी बातमी! एनसीबीच्या समीर वानखेडेंमागे पोलिसांचे गुप्तहेर? DGP कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 22:17 IST

NCB's Sameer Wankhede snooped by Mumbai Police: आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबई समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)

एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. ओशिवारा पोलासांनी स्मशान घाटावर जात समीर वानखेडे यांची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते रोज या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे.

 

या क्रूझ पार्टीमध्ये शाहरुखचा मुलगा सापडल्याने ही हाय प्रोफाईल केस बनली आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीची टीम यावर काम करत आहे. चार्जशीट फाईल करण्यासाठी एनसीबीकडे ६ महिन्यांचा वेळ आहे. यामुळे वानखेडेंचा य़ेथील सेवा कालावधी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यांना दुसऱ्यांदा एक्स्टेंशन मिळाले आहे. समीर वानखेडेंनी गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींचे ड्रग्ज आणि रॅकेट पकडली आहेत. गेल्या वर्षीच वानखेडे यांना डीआरआयहून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai policeमुंबई पोलीसAryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी