शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून पैसे काढताय? सावधान...सेंटर गार्डचा नंबर निघाला सायबर भामट्याचा !

By गौरी टेंबकर | Updated: February 14, 2023 17:21 IST

नंबरवर फोन केल्यानंतर अकाऊंटमधून काढण्यात आली रक्कम.

मुंबई: अनोळखी तरुणीने एटीएम सेंटरमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक हा तिथल्या गार्डचा नसून सायबर भामट्याचा असल्याचे ट्रॅव्हल एजंटस फेडरेशन ऑफ इंडिया कंपनीतून निवृत्त झालेल्या ग्लडविन पिंटो (७१) यांना समजल्यावर धक्काच बसला. कारण त्यावर फोन नंतर त्यांच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढण्यात आले.

पिंटो हे मालाडच्या एवरशाईन नगरमध्ये पत्नी ब्रुनीतासोबत राहतात. ते ७ फेब्रुवारी रोजी ऑर्लेम चर्च येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये कोणी नव्हते. मात्र तरीही एक अनोळखी इसम थांबला होता जो थोड्या वेळाने आत जाऊन बाहेर आला. तेव्हा पिंटोंनी एटीएम मधून डेबिट कार्ड ने १० हजार रुपये काढले व त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. तेव्हा ते एटीएम सेंटरच्या गार्डला शोधू लागल्याने समोर उभी मुलगी त्यांच्या मदतीच्या बहाण्याने पुढे आली. तिला कार्ड अडकल्याचे सांगत त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न करताना एटीएम सेंटरमध्ये शिरत ती पिंटोंच्या मागे उभी राहिली.

तिने त्यांना इंग्रजीत कागदावर GAURD 7295929742 असे लिहिलेला कागद देत त्यावर फोन करायला सांगितले. फोन उचलणाऱ्याने तो बीकेसीमध्ये मिटींगसाठी आल्याचे बोलत मशीनच्या की पॅड वरील काही बटन दाबण्यास त्यांना सांगितले. तसे केल्यावरही कार्ड बाहेर न आल्याने त्यांना कार्डचा पिन नंबर दाबण्यास सांगितले जे सदर मुलगी पाहत होती. पिंटोनी नंबर दाबल्यावरही कार्ड न निघाल्याने दुपारी ३ वाजता इंजिनियर येऊन ते काढून देईल असे त्यांना फोन वरील व्यक्तीने सांगितले.

पिंटो घरी गेले आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून ५६ हजार काढण्यात आल्याचा मेसेज आला. ज्यातील १० हजार पिंटोनी व उर्वरित रक्कम फसवणूक करत काढण्यात आली. त्यामुळे पिंटू पुन्हा त्या एटीएममध्ये गेले आणि सकाळचा इसम त्यांना पुन्हा दिसला. ज्याने पिंतोना पाहत तिथून पळ काढला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पिंटोंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार आम्ही एटीएम समोर असलेला, गार्ड म्हणून फोनवर बोलणारा असे दोन इसम तसेच तो नंबर पिंटोना देणाऱ्या महिलेचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :atmएटीएमcyber crimeसायबर क्राइम