शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बँक रोखपालालाच एटीएम भामट्याचा गंडा; कांदिवली पोलिसात घेतली धाव

By गौरी टेंबकर | Updated: February 28, 2024 14:57 IST

अखेर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली.

मुंबई - कांदिवली परिसरात एका नामांकित बँकेत काम करणाऱ्या बँकरला बोलण्यात गुंतवून त्याचे एटीएम कार्ड लंपास करण्यात आले. तसेच त्यातून काही रक्कम काढत खरेदी ही करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर दोन अनोळखी भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कांदिवली पश्चिम शाखेत तक्रारदार अनिल चव्हाण (५५) हे कॅशियर म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २७ फेब्रुवारी रोजी ते काम संपवून संध्याकाळी साडेचार च्या सुमारास बँकेतून दहिसर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या घरी जायला निघाले. त्यांना वैयक्तिक कामासाठी पैसे हवे असल्याने जवळच असलेल्या एमटीएनएल बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्यांनी २० हजार रुपये काढायचा प्रयत्न केला. मात्र ते पैसे निघत नव्हते जे पाहून त्यांच्या मागे उभे असलेल्या ३० ते ४० वयोगटातील दोन इसमांनी त्यांना त्यांचा प्रॉब्लेम विचारला. ज्यावर एटीएम मधून पैसे निघत नसल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आणि त्या दोघांनी त्यांच्या हातातून एटीएम कार्ड घेऊन पुन्हा ते मशीनमध्ये टाकत त्यांना पिन कोड दाबायला सांगितला. मात्र तरी देखील त्यांचे पैसे निघाले नाही त्यामुळे ते बाहेर आले आणि घरी जायला निघाले.

घरी पोहोचणार इतक्यात त्यांना मोबाईलवर मेसेज आले ज्यात त्यांचा खात्यातून चार व्यवहारांमध्ये ४० हजार रुपये काढण्यात आले. इतकेच नव्हे तर १८ हजार रुपयांची खरेदी करत एकूण ५८ हजारांची फसवणूक झाल्याचेही त्यांना समजले. त्यांनी त्यांच्याकडे असलेले कार्ड तपासले तेव्हा ते त्यांचे एटीएम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना बोलण्यात गुंतवून सदर भामट्यांनी त्यांचे एटीएम कार्ड बदलले होते. अखेर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :fraudधोकेबाजी