शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न; ६० टक्के भाजल्याने मुंबईला हलविले

By अजित मांडके | Updated: September 21, 2022 23:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून कळवा,खारेगाव येथील योगेश रोहिदास पवार (३८) यांनी आत्महत्येचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून कळवा,खारेगाव येथील योगेश रोहिदास पवार (३८) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कळवा खारेगाव येथे घडली. या घटनेत पवार हे ६० टक्के भाजले असून त्यांना उपचारासाठी कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर स्वरूपात भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

      योगेश पवार हे कळवा खारेगाव येथील तळ अधिक ५ मजली असलेल्या दी नरेश सोसायटीत भाड्याने राहत आहेत. त्या रूममध्ये मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले अशी माहिती मिळताच, घटनास्थळी कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच जखमी पवार (३८) यांना   उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल केल्यावर पवार हे ६० टक्के भाजल्याची  माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच ते गंभीर स्वरूपात भाजले असल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.