शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

आता बँक खात्यातून पैसे चोरी झाल्यास एक्सपर्ट लावणार छडा अन् परत करणार रक्कम!

By ravalnath.patil | Updated: October 29, 2020 16:31 IST

Cyber Fraud : आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देटीममध्ये 12615 लोक आहेत. यामध्ये पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालयीन सेवेशी संबंधित लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : एटीएम किंवा डेबिट कार्ड आपल्या खिशात ठेवलेले असते. मात्र, आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. एवढेच नाही तर सायबर गुन्हेगार (सायबर फ्रॉड) दुसर्‍याच्या हातात गेलेल्या आपल्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करतात. मात्र, ही फसवणूक ज्यावेळी आपल्या मोबाइलवर या ट्रान्जक्शनचा(Mobile Transations) मेसेज येतो. त्यावेळी कळते. परंतु आता अशा प्रकारच्या सायबर आर्थिक फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची टीम तयार केली आहे. या टीमला सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हटले जाणार आहे. टीमच्या मदतीसाठी देशात लॅबोरटरी तयार करण्याचे कामही सुरू आहे.

12615 जणांच्या या टीममध्ये तीन प्रकारचे एक्सपर्ट असतील संसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे. टीममध्ये 12615 लोक आहेत. यामध्ये पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालयीन सेवेशी संबंधित लोकांचा समावेश आहे. हे सर्व देशाच्या विविध भागातील आहेत. हे खासकरून सायबर आर्थिक फसवणुकीतील पीडिताला मदत करतील. तसेच, महिला आणि मुलांवर होणाऱ्या सायबर क्राइममध्ये सुद्धा पीडिताला मदत करतील.

तक्रार करण्यासाठी पोर्टल तयारसंसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिका-यांनीही सांगितले की, आता सायबर आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. पीडित व्यक्ती घरी बसून सायबर क्राइम नावाच्या पोर्टलवर तक्रार देऊ शकते. एकदा तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकारी पीडितेशी स्वतः संपर्क साधतील. तसेच महिला व मुलांवरील सायबर क्राईमच्या तक्रारीही या पोर्टलवर करता येतील आणि अशा विशेष प्रकरणात तक्रारदाराची ओळख देखील गोपनीय ठेवली जाईल. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमatmएटीएम