शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची माहिती मागवल्याने मारहाण; दिवा येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 19:25 IST

शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : माहिती अधिकारातून शाळेची माहिती मागवल्याने मुंबईच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. अर्जावर सुनावणीच्या बहाण्याने त्यांना दिवा येथील शाळेत बोलावून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या अर्जावर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी दिवा येथील एका शाळेची माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. यावर सुनावणीसाठी त्यांना गतमहिन्यात दिवा येथील शाळेत बोलवण्यात आले होते. त्यानुसार ते शाळेत आले असता मुख्याध्यापकांच्या दालनाबाहेर उभ्या असलेल्या दोघांनी त्यांना एका वर्गात नेवून मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर जखमी अवस्थेत ते रबाळे पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते थेट घरी गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याद्वारे सोमवारी रबाळे पोलीस ठाण्यात मुन्ना यादव व राममूर्ती यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.