शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

अल्पवयीन मुली व महिलांशी अनैतिक कृत्य करणाऱ्या विकृतास अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 13:10 IST

तब्बल १८ गुन्हे आहेत दाखल, पोलिसांनी अटक केलेला वासनांध आरोपी कल्पेश देवधरे (३०) हा वाहन चालक असून तो मूळचा कांदिवली भागातील राहणार आहे  

मीरारोड - अल्पवयीन मुली , महिलां सोबत अश्लील अनैतिक प्रकार करणाऱ्या वासनांध विकृतास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ ने नालासोपारा येथून बेड्या ठोकल्या आहेत . त्या वासनांधवर मुंबईत तब्बल १७ तर १ वसई मध्ये विनयभंग , पोक्सो आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात १८ एप्रिल रोजी एका ९ वर्षीय अल्पवयीन बालिकेसोबत अनैतिक प्रकार घडल्याचा पोक्सो व बलात्कारचा गुन्हा दाखल झाला होता . अल्पवयीन मुली सोबत झालेल्या ह्या अतिप्रसंग मुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखे सोपवला होता . उपायुक्त डॉ . महेश पाटील यांच्या व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक अविराज कुराडे , सपोनि कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे , उपनिरीक्षक हितेंद्र विचारे राजेंद्र वेदपाठक, राजु तांबे, किशोर वाडीले, अर्जुन जाधव, संदिप शिंदे, संजय शिंदे, अविनाश गर्जे, मुस्तकीन पठाण, पुषेंद्र थापा, संतोष लांडगे, सचिन सावंत, प्रशांत विसपुते, विकास राजपुत व सुमित जाधव यांचे पथक आरोपीच्या शोधात होते . 

पोलिसांनी घटनास्थळा पासून ते आरोपीच्या हालचाली पर्यंत सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले .  आरोपी हा घटनास्थळी येतांना नालासोपारा येथून ट्रेनने मीरारोड येथे आल्याचे समजले. तसेच घटनेनंतर सदर आरोपी हा मीरारोड येथून मुंबई येथे गेल्याचे समजले. प्राप्त माहिती, फुटेज व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला नालासोपारा येथून ताब्यात घेतले व बुधवारी नया नगर पोलिसांच्या स्वाधीन केले.  

पोलिसांनी अटक केलेला वासनांध आरोपी कल्पेश देवधरे (३०) हा वाहन चालक असून तो मूळचा कांदिवली भागातील राहणार आहे . तो १६ - १७ वर्षांचा असताना व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लील सिनेमे पाहून त्याला अल्पवयीन मुली व महिलां सोबत अनैतिक व अश्लील प्रकार करण्याची विकृती जडली . त्याच्या ह्या दुष्कृत्या मुळेच घरच्यांनी त्याला हाकलून दिला असून सध्या तो मुंबई सेंट्रल येथील एका सामूहिक पेइंग गेस्ट ठिकाणी रहातो . त्याच्या विरुद्ध मुंबईतील  विविध पोलीस ठाण्यात २०११ साला पासून तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत . वसईतील माणिकपूर पोईलीस ठाण्यात १ असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत . अनेक गुन्ह्यात तो अटक झाला असून जवळपास सर्वच गुन्हे हे विनयभंग , पोक्सो , अपहरण आदी स्वरूपाचे आहेत . आरोपीने असे अन्य गुन्हे केल्याची शक्यता आहे