शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सलूनमध्ये वाद चिघळला, वस्तऱ्याने युवकाचा गळा कापला; जमावानं आरोपीलाही ठार मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:13 IST

युवकाचा खून करणाऱ्यास जमावाने केले ठार, नांदेड जिल्ह्यातील घटना : किनवट हादरला

किनवट (जि. नांदेड) : दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या तरुणाशी भांडण झाल्याने सलून चालकाने वस्तऱ्याने त्याच्या गळ्यावर वार केला. यामुळे तरुण मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण करीत ठार केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी बोधडी बुद्रुक, ता. किनवट येथे सायंकाळी घडली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.

बोधडी (बु.) येथील व्यंकटी सुरेश देवकर (२२) हा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल मारोती शिंदे (३२ ) याच्या हेअर सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता. तेव्हा काही कारणावरून दोघांत वाद झाला. त्यातून अनिल शिंदे याने दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तऱ्याने व्यंकटी देवकर याच्या गळ्यावर वार केला व तो पसार झाला. गंभीर जखमी झालेला व्यंकटी देवकर जीव वाचविण्यासाठी गळ्याला रुमाल धरत तेथून लगेच निघाला आणि ५० फूट चालत जाऊन कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.

व्यंकटीच्या खुनाच्या घटनेमुळे येथे जमलेले गावातील लोक संतप्त झाले. त्यांनी मारेकरी अनिल शिंदे याचा शोध घेतला. तो नाल्याच्या काठी एका झुडपात लपून बसला होता. जमावाने त्यास शोधून, तेथून मारत-मारत मार्केटमध्ये आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिलही ठार झाला. मृत अनिल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जात आहे.