शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कर्मचाऱ्यांची आणखी एक हेराफेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 23:37 IST

भडगाव : तारण सोने काढून ठेवले दुसऱ्यांच्या नावावर, पाच जणांना अटक 

 भडगाव जि. जळगाव  :   आमडदे ता. भडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बॕकेतील चोरी प्रकरणात कर्मचाऱ्यांनीच हेराफेरी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.  या बॅंकेतील तारण सोने काढून कर्मचाऱ्यांनीच अन्य बॅंकेत दुसऱ्याच्या नावावर तारण ठेवले.  या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. इंद्रनील पाटील (रा. भडगाव), राजेद्र गोबा पाटील, राजेद्र रामराव पाटील, हेमराज मधुकर पाटील (रा. आमडदे), रणजित मुरलीधर पाटील (रा. वरखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बॕकेत तारण ठेवलेले सहा किलो  सोने बॅंक कर्मचाऱ्यांनीची चोरुन नेले होते. या सोन्याची किंमत ३ कोटी १७ लाख रुपये आहे. ही घटना मंगळवार ३० रोजी घडली होती. यात बॕकेतील शिपाई राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील, विकास पाटील यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. तीनही आरोपीना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान,  बॕकेत तारण ठेवण्यात आलेल्या सहा किलो सोन्यापैकी २१ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे  ४३८ ग्रॅम सोने कमी भरले. यामुळे बॕकेचे मॕनेजर तन्मय अजय देशपाडे यांनी पोलिसात पुन्हा फिर्याद दिली.  

 शेतकरी कर्जदार यांनी ठेवलेल्या तारण सोन्याची राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील यांनी अदलाबदल केली. एवढेच नाही तर तारण ठेवलेले सोने काढून ते वरील पाच जणांच्या ताब्यात दिले आणि तेच सोने या पाचही जणांच्या  नावाने अन्य बॕकेत पुन्हा तारण ठेवले आणि त्यावर कर्जही घेतल्याचे समोर आले आहे. या सर्वांना अटक करण्यात आली.  त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.    या चोरी प्रकरणात  आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी दिली.