शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 20:23 IST

हे जोडपे ज्या ठिकाणाहून गायब झाले तिथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. या पावसामुळे शोधमोहिमेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूरमधून हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे रहस्यमयपणे गायब झाले असून मागील ९ दिवसांपासून त्यांचा कुठलाच सुगावा पोलिसांना लागलेला नाही. इंदूर पोलीस सातत्याने शिलांग पोलिसांच्या संपर्कात आहे. इंदूर पोलिसांची एक टीम शिलांगला पोहचली आहे. आतापर्यंत गायब झालेल्या जोडप्याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.

इंदूरला राहणारा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत शिलांगला हनीमूनसाठी गेले होते. परंतु अचानक ते शिलांगपासून ३० किमी अंतरावरील ओयरा हिल्स येथून गायब झाले. त्यानंतर ९ दिवसांपासून त्यांचे नातेवाईक शिलांगच्या ओयरा हिल्स येथील दऱ्याखोऱ्यात या दोघांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी इंदूर पोलीस आणि शिलांग पोलीस शोधमोहिम राबवत असून मध्य प्रदेश आणि मेघालयचे मुख्यमंत्रीही एकमेकांच्या संपर्कात आहेत. 

हे जोडपे ज्या ठिकाणाहून गायब झाले तिथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. या पावसामुळे शोधमोहिमेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. इंदूर पोलिस शिलांगमध्ये शोध घेत असून त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नातेवाईक संपर्कात आहेत अशी माहिती इंदूरचे डीसीपी राजेश त्रिपाठी यांनी दिली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन हे दोघेही राजा-सोनमचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, राजा पत्नी सोनमसह हनीमूनसाठी शिलांगला आले होते. २३ मे रोजी राजा यांचं त्यांच्या आईसोबत अखेरचे बोलणे झाले. तेव्हापासून हे दोघे बेपत्ता आहेत. 

हे जोडपे २२ मे रोजी मावलखियात गावात पोहचले होते आणि तिथून भाड्याने स्कूटर घेत नोंग्रियात गावातील लिविंग रूटब्रिज पाहण्यासाठी गेले होते. तिथे एका होम स्टेमध्ये ते थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. २४ मे रोजी त्यांची स्कूटर शिलांग सोहरा मार्गावरील एका कॅफेजवळ बेवारस अवस्थेत आढळली. मेघालयात अनेक भागात पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे या दोघांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिथून हे दोघे बेपत्ता झाले ती जागा चेरापूंजी नावाने ओळखली जाते. याठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. चुनखडीपासून बनवलेल्या गुहेच्या भिंती, जंगल अशी ही जागा आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMissingबेपत्ता होणं