शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आंबेकरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:31 IST

कुख्यात संतोष आंबेकरला नवे वर्षही पोलीस कोठडीत काढावे लागणार आहे. गुन्हे शाखेने त्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करून ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.

ठळक मुद्देकोठडीत जाणार नवे वर्ष : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कुख्यात संतोष आंबेकरला नवे वर्षही पोलीस कोठडीत काढावे लागणार आहे. गुन्हे शाखेने त्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करून ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.बंदुकीच्या धाकावर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे शोषण करण्याच्या आरोपाखाली संतोष आंबेकर आणि कॉपर सलूनचा संचालक विवेक सिंह यांच्याविरुद्ध पोक्सो तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ९ डिसेंबरला विवेक सिंहला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने आंबेकरला अल्पवयीन विद्यार्थिनी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. मागील आठवड्यात विवेकची जमानत याचिका न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर आंबेकरला अटक करण्यात येणार होती. गुन्हे शाखेने न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवून सहायक पोलीस निरीक्षक प्रीती कुळमेथे यांनी आज आंबेकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना विवेक सिंह याच्या मोबाईलमधून १६० ध्वनी चित्रफिती मिळाल्या आहेत. त्यात विवेक आणि आंबेकरने अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास अत्याचाराच्या अनेक प्रकरणांचा खुलासा होऊ शकतो. ध्वनी चित्रफितीत विवेक ज्या विद्यार्थिनींबाबत आंबेकरशी चर्चा करीत आहे त्यांचा खुलासा झालेला नाही. बदनामी आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे विद्यार्थिनी समोर येण्यास धजावत नाहीत. पीडित विद्यार्थिनींची पोलिसांच्या कारवाईनंतर हिंमत वाढल्यामुळे सहा महिन्यानंतर तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते. आंबेकरविरुद्ध आतापर्यंत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटक