शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंटी बबली सापडले; पुण्यातून येऊन ते करायचे मोटार सायकल चोरी

By राजेश भोस्तेकर | Updated: April 20, 2023 20:12 IST

महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा

अलिबाग : चागल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी असताना घराचे कर्ज डोक्यावर होते. अशातच एका महिलेशी प्रेम संबंध जोडून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी आणि ऐशो आराम जीवन जगण्यासाठी त्या दोघांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले. यातून बंटी आणि बबलीने २ लाख १३ हजाराच्या दहा मोटार सायकलवर हात साफ केले. अखेर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून बंटी आणि बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

आरोपी विक्रम राम कालेकर, वय. 36, मूळ राहणार लाडवली हा पुणे रांजणगाव येथील एमआयडीसीमध्ये  समसंग कंपनीत ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. पुणे येथे कर्जावर घर घेतले होते. आरोपी अनुराधा विवेक दंडवते, वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे हिच्याशी विक्रम याचे प्रेम सबंध होते. घराचे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि एशो आराम जीवन जगण्यासाठी चोरी करण्याचा प्लॅन दोघांनी केला. कंपनीतून सुट्टीच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन हद्दी मधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे हे दोघे बंटी बबली करायचे. 

महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा. ज्या परिसरात चोरी करायचे आहे त्या परिसरात फिरून ज्या मोटरसायकलला चावी आहे अशी मोटरसायकल चोरी करून पसार व्हायचे. पेण, रसायनी, खांदेश्वर याठिकाणी त्यांनी मोटार सायकल चोरल्या आहेत. या बंटी बबली चा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे पथकाने शोध सुरू केला होता. यासाठी सीसीटिव्ही च्या आधारे तपास सुरू केला. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार नुसार पथकाने रसायनी येथे सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी विक्रम कालेकर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी गुन्हा कबूल केला. 

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम, सहाय्यक पोलीस अधिकारी कोरम, पोह मोरे, पोह झेमसे, पोह राजा पाटील,पोह सावंत, पोह म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोनातुषार घरात व पोनाअक्षय पाटील यांनी यशस्वी कारवाई केली आहे.