शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांनी सापडला, मात्र बालगृहातून पुन्हा पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 02:55 IST

चेंबूरच्या बालगृहातून बेपत्ता झालेल्या मुलाचा दोन महिन्यांनी शोध घेत, त्याला पुन्हा बालगृहात पाठविले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो पुन्हा बालगृहातून बेपत्ता झाला.

मुंबई : चेंबूरच्या बालगृहातून बेपत्ता झालेल्या मुलाचा दोन महिन्यांनी शोध घेत, त्याला पुन्हा बालगृहात पाठविले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो पुन्हा बालगृहातून बेपत्ता झाला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करत आहेत.चेंबूरच्या बालगृहातील सुरक्षारक्षक जितेंद्र सोलंकी (४९) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २३ जून रोजी सायंकाळी ७ ते ८ या जेवणाच्या वेळेत मुलांची हजेरी घेतली असता, १२९ मुले हजर होती.जेवणानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा हजेरी घेतल्यानंतर एक १६ वर्षीय मुलगा कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार केली.त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅक्टोबर, २०१४ रोजी या मुलाला संस्थेत दाखल करण्यात आले. त्यानंतर, २ एप्रिल, २०१९ रोजी तो तेथून पळून गेला. २२ जून रोजी तो सापडला. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा बालगृहात दाखल करून घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दुसºयाच दिवशी तो पुन्हा पळाला. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांवर त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई