शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
3
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
4
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
5
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
6
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
7
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
8
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
9
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
10
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
11
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
12
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
13
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
14
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
15
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
16
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
17
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
18
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
19
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
20
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!

सोशल मीडियाच्या Blue Tick स्कॅमचा अभिनेत्रीला गंडा; पोलिसांनी नोंदवला FIR

By गौरी टेंबकर | Updated: March 3, 2023 12:38 IST

अभिनेत्रीने प्रथम १६ हजार २५० आणि नंतर १५ हजार रुपये हस्तांतरित केले, परंतु तिच्या कोणत्याही हँडलची पडताळणी झाली नाही.

मुंबई- संगीतकार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडिया पडताळणी घोटाळा (ब्लू टीक स्कॅम) मध्ये चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.करिष्मा कार असे अभिनेत्रीचे नाव असून तिने टीव्ही शो आणि पंजाबी व दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी, तिला गुरु नावाने इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅट हँडलसाठी तिची सोशल मीडिया पडताळणी (ब्लू टिक) करण्याची ऑफर देणारा एक संदेश इन्स्टाग्रामवर आला. गुरुने दावा केला की तो कमी खर्चात हे काम करू शकतो. "आम्ही गुरुचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले ज्यामध्ये तो संगीतकार असल्याचे सांगितले होते. त्याच्याकडे एक सत्यापित हँडल आहे," असे तिचे व्यवस्थापक जॉन डिसूझागुरु यांनी पोलिसाना सांगितले.  त्यांना सोशल मीडिया पडताळणी करण्याचे निकष माहित आहेत असे सांगत त्यासाठी ३२ हजार रुपयांची मागणी केली.

गुरुने आम्हाला खर्च आणि त्यांच्या बँकिंग माहितीच्या तपशीलांसह एक ईमेल पाठवला. इंस्टाग्राम व्हेरीफाईड पंधरवड्याच्या आत केले जाईल आणि तसे न झाल्यास तो तिला पैसे परत करेल. तसच त्यानंतर विनामूल्य सत्यापन प्रक्रिया पूर्ण करेल, असेही भामट्यांनी सांगितले. त्यांनतर डिसेंबर २०२२ मध्ये, अभिनेत्रीने प्रथम १६ हजार २५० आणि नंतर १५ हजार रुपये हस्तांतरित केले, परंतु तिच्या कोणत्याही हँडलची पडताळणी झाली नाही. त्यानंतर गुरूने तिला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आणि तिच्या कॉल आणि मेसेजला उत्तर देणे बंद केले. यापूर्वी अशाच एका घोटाळ्यात अभिनेत्रीची अन्य एका व्यक्तीकडून ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती.