शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 05:29 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला उड्डाणपुलाखाली, आरोपी दाम्पत्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलीची छेड काढल्याच्या संशयातून घरातील ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस उड्डाणपुलाच्या खाली फेकल्याची धक्कादायक घटना मानखुर्द पोलिसांच्या कारवाईतून सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर मो. अख्तरआलम उर्फ सलीम (३८) याच्यासह त्याची पत्नी फिरोजा हिला अटक केली आहे.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास साठे नगर येथील उड्डाणपुलाच्या खाली एकाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृतदेहाच्या अंगावर जखमा असून मारहाणीमुळे हत्या झाल्याचे समोर आले. हत्येचा गुन्हा नोंदवत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो व्हायरल केले. फोटो पाहून नंन्ने साबीर शेख (३८) पुढे आले, आणि मृत व्यक्ती त्यांचे सासरे असल्याचे सांगितले. 

पोलिसांना मृत व्यक्ती अब्दुल खलील शेख (६९) हे सलीम यांच्या घरात आचारी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे धाव घेतली. सलीम मिळून आले नाही. 

ते पांजरपोळ परिसरात असल्याची माहिती मिळताच, पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. सलीमच्या चौकशीत त्यानेच, शेखची हत्या केल्याची कबुली दिली. मुलीची छेड काढल्याच्या संशयातून त्याने, शनिवारी शेखला मारहाण केली. यात शेखचा मृत्यू झाल्याने त्याला पत्नीच्या मदतीने मानखुर्द परिसरात फेकल्याचे सांगितले. मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली.