शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

येसगाव खून प्रकरणातील आरोपी तासाभरात जेरबंद; कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी 

By सचिन धर्मापुरीकर | Updated: September 12, 2023 18:09 IST

कोपरगाव (अहमदनगर) : पैशाच्या वादातून सोमवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात रात्री उशिरा ...

कोपरगाव (अहमदनगर) : पैशाच्या वादातून सोमवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर  कोपरगाव तालुका पोलिसांनी तासाभराच्या आत चार आरोपींना जेरबंद केले. 

सोमवार दि. ११ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कमानी जवळ दिपक दादा गांगुर्डे (वय ४०) या गवंडी काम करणाऱ्या इसमाने उषा सुनिल पोळ, स्नेहा सुनिल पोळ, राज उर्फ बबलु सुनिल पोळ व आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड ( सर्व रा. येसगाव ता. कोपरगाव) यांनी गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. पैसे मागितल्याचा  चौघांना राग आला.  आरोपींनी मयत दिपक गांगुर्डे यास लाथाबुक्यानी,  दगडाने माराहण करुन लाकडी दांड्याने डोक्यात घाव घातले. त्यानंतर आरोपी पसार झाले. 

या घटनेबाबत मयताची पत्नी जया दिपक गांगुर्डे यांनी  फिर्यादी दिली. त्यावरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी पोहचुन आरोपींच्या  शोधासाठी पथक तयार केले. पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे स्मशाभुमीचे जवळ, झाडामध्ये लपुन बसलेले आहे. त्यानुसार पोलीसांनी स्मशानभुमी परीसर पिंजून काढून सर्व आरोपींना शिताफीने तासाभरात पकडले आहे.

ही कारवाई  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे, पो.काॅ. जयदिप गवारे, रशिद शेख, युवराज खुळे,  राघव कोतकर, प्रकाश नवाळी, चंद्रकांत मेढे, अंजना भांगरे, ज्योती रहाणे, फिजा पठाण यांनी केली.  गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करित आहेत.