शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून फॅशन डिझायनर तरुणीला मित्राकडून मारहाण, वरवंट्याने डाेक्यावर प्रहार

By जितेंद्र कालेकर | Updated: July 11, 2024 22:14 IST

नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: चारित्र्याच्या संशयातून ठाण्यातील २७ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणीला चामडी पट्ट्याने, हातांनी आणि वरवंट्याने मारहाण करणाऱ्या आरिफ नाईक (वय ३४, रा. कोलबाड, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दिली.

आरिफ आणि या तरुणीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. ९ जुलै २०२४ रोजी हे दोघेही त्यांच्या अन्य काही मित्र-मैत्रिणींसह पार्टीसाठी उपवन येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. हे सर्वजण १० जुलै रोजी पहाटे ६:३० ते ६:४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर आरिफ याने इतर मुलांशी का बोलतेस, असा संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामध्ये त्याने तिला हाताने आणि त्याच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीला तिच्या मैत्रिणीने विरोध केला. मात्र, त्याने तिचेही ऐकले नाही. त्यानंतर आरिफने किचनमधील वरवंटा तिच्या डोक्यावर मारला. त्यातच डोक्यातून रक्तस्राव झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे