शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिमेंटच्या ब्लॉकनं डोकं ठेचून महिलेची हत्या; अज्ञातांविरोधात गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 23, 2023 16:01 IST

तुर्भे एमआयडीसी मधील घटना 

नवी मुंबई : सिमेंटच्या ब्लॉकने डोकं ठेचून महिलेची हत्या झाल्याची घटना तुर्भे एमआयडीसी भागात घडली आहे. सुमारे ३० ते ३५ वयोगटातली ही महिला असून तिची ओळख पटलेली नाही. दरम्यान तिच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने लुटीच्या उद्देशाने हा प्रकार झालेला नसून हत्येमागे वेगळे कारण असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

अडवली भुतवली ग्रामस्थांच्या गावदेवी मंदिराच्या मार्गालगत हा प्रकार घडला आहे. बुधवारी परिसरातील काही व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात चालल्या होत्या. यावेळी पाऊल वाटेपासून काही अंतरावर एक महिला पडलेली असल्याचे त्यांनी पाहिले. यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले असता तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळाचा पाहणीत सदर महिलेच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला असल्याचे दिसून आले. शिवाय हा ब्लॉक त्याठिकाणी पडलेला देखील आढळून आले. मात्र महिलेची ओळख पटेल असे काही तिच्याकडे आढळून आले नाही. त्यानुसार या अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून हातात बांगड्या व कपाळावर कुंकू आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.