शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

थरारक पाठलाग करून आवळल्या चोराच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 10:03 IST

१० गुन्ह्यांची उकल, तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सराईत चोरटा शंकर भीमराव सूर्यवंशी ऊर्फ धोत्रे ऊर्फ चेनाळे (२६) याला मानपाडा पोलिसांनी  गजाआड केले. वझे कंपाऊंड परिसरात भर दुपारी घरफोडी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच निसटलेल्या या चोरट्याचा अर्धा तास पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यात आले. अर्धा ते पाऊणतास हा थरार सुरू होता. चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णूनगर पोलिस ठाण्यातील एकूण १० गुन्ह्यांची उकल झाली. 

जानेवारीपासूनच घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. बहुतांश घटना मध्यरात्रीसह दिवसाढवळ्याही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर  पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत तपासासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. त्याप्रमाणे मानपाडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुसाद काटकर, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, दीपक गडगे, सोमनाथ टिकेकर, सुनील पवार, गिरीश पाटील, विकास माळी, संजय मासाळ, पोलिस नाईक गणेश भोईर, प्रवीण किनरे, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, पोलिस शिपाई महेंद्र मंझा, संदीप चौधरी, अशोक आहेर, विजय आव्हाड  यांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

असा केला पाठलागघरफोडीची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वनवे व तारमळे यांची पथके रवाना झाली. पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरट्याने पळ काढला आणि एमआयडीसीतील कंपन्यांच्या परिसरातून बचावासाठी धावू लागला, मात्र पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. शंकर  मूळचा कर्नाटकचा आहे.  त्याचा आणखीन एक साथीदार असून त्याचा शोध सुरू आहे