शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 23, 2024 16:20 IST

शाळेत टाकण्याच्या बहाण्याने बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेत सोडले

नागपूर : लिव्ह इनमध्ये एका महिलेसोबत राहत असताना तिचा साडे चार वर्षांचा बालक अडसर वाटू लागल्याने प्रियकरानेच या बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत सोडून दिले. दरम्यान गणेशपेठ पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी या बालकाला सुखरुप नागपूरात आणून आरोपी प्रियकराला गजाआड केले आहे.

आरोपी हंसराज ज्ञानेश्वर दखने (२५, रा. पोरा, ता. लाखनी जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्यामुळे ती पतीपासून विभक्त राहते. तिला साडे चार वर्षांचा मुलगा आहे. महिनाभरापूर्वी महिलेची आरोपी हंसराजसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यामुळे ते लिव्ह इनमध्ये राहु लागले. आरोपीने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु महिलेने आपल्या मुलासह स्वीकार करण्याची अट घातली. परंतु साडेचार वर्षांचा बालक आरोपीला अडसर वाटु लागला. त्याने या बालकापासून सुटका करून घेण्याचा बेत आखला.

आरोपीने शुक्रवारी २१ जूनला दुपारी ३ वाजता साडे चार वर्षांच्या बालकाला सोबत घेतले आणि त्याचा शाळेत प्रवेश करून येतो, असे महिलेस सांगितले. परंतु आरोपी हंसराज घरी एकटाच परतला. त्यामुळे महिलेने आपला मुलगा कुठे आहे, अशी विचारना केली. परंतु खापरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पीटलजवळील सिटी बसस्टॉप येथे अज्ञात ३ आरोपींनी मुलाला पळवून नेल्याचे आरोपीने महिलेस सांगितले. त्यातील एका व्यक्तीला या मुलाने पप्पा असे म्हटल्याचे त्याने सांगितले. त्यावर महिलेने आपल्या पूर्वीच्या पतीला फोन करून विचारना केली असता त्याने आपण मुलाचे अपहरण केले नसल्याचे त्याने सांगून पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

महिलेने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी हंसराजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आरोपीने नागपूर रेल्वेस्थानकावरून या मुलाला दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ४ वर वर्धाकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिल्याचे सांगितले. गणेशपेठ पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्वरीत दखल घेऊन मुलाला वर्धा येथून सुखरुप नागपुरात आणले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी हंसराजविरुद्ध कलम ३१७, ३६३, १८२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.