शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या सचिवांची लढाई गुद्द्यांवर, श्रीरामपुरात गुन्हा दाखल

By शिवाजी पवार | Updated: November 23, 2023 14:51 IST

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : बाजार समितीच्या सचिवपदाचा पदभाराची न्यायालयीन लढाई आता गुद्द्यावर आली आहे. सचिवपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या किशोर काळे यांना प्रभारी सचिवांसह त्यांच्या साथीदारांनी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.      सचिव काळे यांच्या फिर्यादीवरून प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. समितीच्या सचिव पदांनी कार्यभार वाबळे यांच्याकडे असून जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार तो काळेंकडे देण्यात येणार आहे. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत. मंगळवारी समितीमध्ये पदभार स्वीकारण्यासाठी गेलो असता वाबळे यांच्यासह १० ते १२ जण तेथे आले. त्यांनी लाथाबुक्क्यांनी, तसेच हॉकीस्टीकने जबर मारहाण केली. पुन्हा पदभार स्वीकारण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. समवेत असलेल्या कैलास भनगे या मित्राला ही मारहाण करण्यात आली, असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आपण २००४ ते २०१२ या काळात सचिव पदावर कार्यरत होतो. मात्र दत्तात्रय तुकाराम कचरे (रा. खोकर) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे कामकाज संबंधी तक्रार केली होती. त्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशी दरम्यान सचिवपदाचा कार्यभार कांदा विभागाचे प्रमुख साहेबराव वाबळे यांच्याकडे देण्यात आला. चौकशीत ठेवण्यात आलेल्या आरोपांविरूद्ध नाशिक येथील विभागीय सह निबंधकांकडे दाद मागितली. तेथे आपल्या बाजूने निकाल देण्यात आला. पणनमंत्री यांनीही तो आदेश कायम ठेवला. त्यानुसार पदभार स्वीकारण्यासाठी गेलो, असे ही मारहाण झाली, असे काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर