शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक; आरोपी पसार

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2023 20:59 IST

कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा, टप्याटप्याने तिच्या बँक खात्यातून चार लाख २९ हजार ७३७ रुपये काढून तिची आर्थिक फसवणुक केली

ठाणे : विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या नावाखाली एका महिलेची परमिल कुमार या भामटयाने चार लाख २९ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली. 

घोडबंदर रोड येथील एका ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाईलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० ते  सायंकाळी ५.१८ वाजण्याच्या सुमारास परमिल कुमार नामक अज्ञात भामटयाने आर्मी पब्लीक स्कुल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी कॉल केला. त्यासाठी शुल्कही ठरविल्यानंतर  दुसºया मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. याचदरम्यान, त्या महिलेच्या अ‍ॅक्सीस बँकेतील खात्याच्या डेबिट कार्डची माहिती चलाखीने पाहून घेतली.  त्यानंतर या भामटयाने बँक खाते लिंक करण्याचे कारण सांगून तक्रारदार महिलेला आधी दहा रुपये नंतर शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. ती पैसे ट्रान्सफर करीत असताना त्याने तिच्या बँक खात्याची माहिती घेतली. 

त्यानंतर टप्याटप्याने तिच्या बँक खात्यातून चार लाख २९ हजार ७३७ रुपये काढून तिची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द  फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड हे करीत आहेत.