शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शूज, पर्समधून २० कोटीच्या कोकेनची तस्करी; दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या

By मनीषा म्हात्रे | Updated: November 21, 2022 22:08 IST

एनसीबीची कारवाई, दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती

मुंबई -  शूज, पर्समधून २० कोटी किंमतीच्या २.८०० किलो कोकेनच्या तस्करीचा डाव एनसीबीने उधळून लावला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या दोन परदेशी महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबी मुंबईने या कारवाईत मरिंडा एस. आणि एच. मुसा नावाच्या दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

एनसीबी मुंबईचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदशर्नाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळताच तपास सुरु केला. या ड्रग्ज रॅकेटमध्ये मरिंडा एस नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेबाबत माहिती एनसीबीला मिळाली. याच माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून रविवारी इथियोपिया येथून मुंबईत आलेल्या मरिंडा एस. हिला ताब्यात घेतले. या महिलेकडील सामानामध्ये एनसीबीला २.८०० किलो वजनाचे उच्च दर्जाचे कोकेन सापडले. दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती. मरिंडा एस हिला ताब्यात घेऊन एनसीबीने तिच्याकडे कसून चाैकशी केली असता तिने अंधेरीतील एका हाॅटेलमध्ये एका व्यक्तीला हे ड्रग्ज पोच करायचे असल्याचे सांगितले.

त्यानुसार, एनसीबीच्या दुसऱ्या पथकाने अंधेरीतील हाॅटेलमध्ये सापळा रचून एच. मुसा या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत ती मरिंडाकडून माल घेण्यासाठी आली असल्याचे सांगितले. तेथून हा माल मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. ती मुंबईत कुणाला हा माल देणार होती? यासह यामागील मुख्य सूत्रधाराबाबत पथकाकडून अधिक तपास सुरु आहे....दक्षिण अमेरिका ते मुंबई ... दक्षिण अमेरीकेतून हे कोकेन मुंबईत तस्करीसाठी आणण्यात आले होते. दोन्ही महिलांकडे त्यांचे स्थानिक ग्राहक आणि विदेशात असलेले पुरवठादार यांच्याबाबत चाैकशी सुरु असल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच, त्यांच्याकडील मोबाईलही पथकाने ताब्यात घेत अधिक  तपास सुरु आहे.