शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग, कोट्यवधीची फसवणूक; दोघांना अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: March 31, 2024 20:42 IST

अंगडिया बनून मुंबईतील व्यावसायिकांची कोट्यवधींना फसवणूक

मुंबई : राजस्थानमध्ये आलिशान घरे बांधण्यासाठी दोन चुलत भावंडानी थेट अंगडिया बनून मुंबईतील व्यापाऱ्यांना टार्गेट केल्याचे एल टी  मार्ग पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी  भगाराम सारस्वत (२४) आणि काळुराम भगीरथ शर्मा (२२) या भावंडाना बेड्या ठोकलया आहेत.

आरोपींनी एका कंपनीची एक कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. कुरिअर सेवा देण्याच्या बहाण्याने त्यांनी मासे निर्यात करणारी कंपनी चालवणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक केली. त्यांचे अन्य दोन साथीदार अद्याप पसार आहेत. आरोपींनी व्हीके अश्रफ एंटरप्रायझेसला कुरिअर देण्यासाठी संपर्क साधला तेव्हा ही घटना उघडकीस आली. “आरोपींनी मासे निर्यात करणाऱ्या कंपनीला आश्वासन दिले होते की ते १ कोटी रुपयांचे कुरिअर सुरक्षितपणे त्या ठिकाणी पाठवतील. मात्र, त्यांना रक्कम हायती लागल्यानंतर ते पसार झाले. याप्रकरणी १ मार्च रोजी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध  घेतला. ते कोलकाता येथे असल्याचे समजले. तसेच एक संशयित अहमदाबाद येथे असल्याचे समजताच पथकाने एक पथक अहमदाबादला रवाना झाले. अहमदाबादला १८ मारच रोजी काळुराम त्यांच्या हाती लागला. काळुरामच्या चौकशीतून भावंडांचा प्रताप उघडकीस आला. बिकानेरमधून सारस्वतला देखील अटक करण्यात आले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बिकानेरच्या तेजसर गावात राहत होते. “दोघांनी त्यांच्या गावात घरे बांधण्याचे स्वप्न रंगवले होते. अन्य दोन आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. या टोळीने अशाप्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहे.