शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक, ४ गुन्ह्यांची केली उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 17:20 IST

पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांची कामगिरी

मंगेश कराळे

नालासोपारा :- दुचाकी चोरी करणाऱ्या दुकलीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करत चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.

धानिवबाग नाका येथे राहणारा तरुण सलिम युनूस अन्सारी (२१) याची दुचाकी ९ मार्चच्या रात्री राहते घराचे परिसरात पार्किंगमधून चोरटयाने चोरी केली होती. वर नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या अवलोकना मार्फत प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी  साजिद सलमानी (२१) आणि आबिद शाह ऊर्फ लंगडा (१९) या दोघांना ६ एप्रिलला ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यावर तो गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात अटक करण्यात आली. अटक आरोपीत यांचेकडे अधिक तपास करुन ४ गुन्ह्यांची उकल करून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, निखिल मंडलिक यांनी केली आहे.