शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटींचा गंडा; जीएसटी विभागाने केली एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 09:02 IST

खोटी कागदपत्रे सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाने मोहीम सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मेसर्स ओमनिपोटंट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकाने जीएसटी विभागाला बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटी ५१ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी संस्थेच्या मुख्य सूत्रधारास अटक केली असून, न्यायालयाने संबंधित संचालकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

 खोटी कागदपत्रे सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाने मोहीम सुरू केली आहे. २०२१- २२ या वर्षात नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ५४३ कोटींची जीएसटी चोरी उघडकीस आणली आहे. यातील ४१ कोटी ४७ लाख वसूल केले असून, आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. 

१२० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पावत्या मेसर्स ओमनिपोटंट लिमिटेडच्या संचालकांनी वस्तू व सेवांचा पुरवठा न करता तब्बल १२० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पावत्या सादर केल्या होत्या. या आधारे त्यांनी १९ कोटी ५१ लाख  रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविला होता. याप्रकरणी जानेवारी २०२२ मध्ये दोघांना अटक केली होती; परंतु या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या कंपनी संचालक सात महिने फरार होता. त्यास जीएसटी विभागाने शुक्रवारी अटक केल्याची माहिती जीसीएसटी आयुक्त प्रभात कुमार यांनी दिली.

टॅग्स :GSTजीएसटी