लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात गुरुवारी काही धक्कादायक बाबी समोर आल्या. ज्याद्वारे खरातच्या करामतींचा भंडाफोड झाला अशा एकूण चार डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल एसआयटीला प्राप्त झाला. वेगवेगळ्या अशा एकूण १६० जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे हे काळे कारनामे दडले असून, खरातच्या गळ्याभोवतीचा फास या पुराव्यांमुळे घट्ट झाला आहे.
तपासणीदरम्यान प्रत्येक डिजिटल पुराव्यावर पोलिसांनी ए, बी, सी नावाचे कोडवर्ड दिले असून, त्यात ए म्हणजे खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात केले गेलेले काळे कारनामे पाेलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ३२ जीबी क्षमतेचे असलेले एकूण तीन युएसबी २.० पेन ड्राईव्ह तसेच ६४ जीबी क्षमतेचा ओटीजी पेनड्राइव्ह या चार डिजिटल पुराव्यांसह जप्त केलेल्या लॅपटॉपचे विश्लेषण एसआयटीने केले.
तिसऱ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी
भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. गुरुवारी (दि.९) झालेल्या सुनावणीत खरातने पीडितेला कसे आपल्या जाळ्यात ओढले, हे सांगताना खरातने तुला मुलगाच होईल, असे सांगत गर्भवतीला संबंध ठेवायला भाग पडल्याचा आरोप वकिलांनी केला.
रजिस्टरमध्ये एकाच व्हिजीटरची अनेकदा नावे
गर्भवती महिलेवर भोंदू खरातने जे अत्याचार केले, त्या गुन्ह्यातील प्रकरणाचा तपास करताना एसआयटीला पुरावे मिळाले. या रजिस्टरमध्ये एकच व्यक्ती किमान तीन ते चार वेळा भोंदू खरातच्या कार्यालयात आल्याच्या नोंदी आहेत. असे दहा ते बारा जण आढळून आले असून, त्यात महिला व्हिजीटरचाही समावेश आहे.
Web Summary : Forensic analysis of 160GB digital evidence exposes fake guru Ashok Kharat's misdeeds, including sexual assault. Evidence includes USB drives and a laptop from his office, revealing crimes against women. Kharat received five days police custody. Register shows repeated visits by same individuals.
Web Summary : 160 जीबी डिजिटल सबूतों के फोरेंसिक विश्लेषण से फर्जी गुरु अशोक खराट के कुकर्म उजागर हुए, जिसमें यौन उत्पीड़न भी शामिल है। सबूतों में यूएसबी ड्राइव और एक लैपटॉप शामिल है, जिसमें महिलाओं के खिलाफ अपराधों का खुलासा हुआ है। खराट को पांच दिन की पुलिस हिरासत मिली। रजिस्टर में एक ही व्यक्ति द्वारा बार-बार आने का पता चला।