शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सराफाचे दुकान फोडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2023 12:44 IST

या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड वरील स्वर्ण पॅलेस या सराफा पेढीवर भल्या पहाटे अज्ञात व्यक्ती जबरी चोरी करीत तब्बल १ कोटी १० लाखांचे सोने चांदीचे दागिने आणि १० हजाराची रोख रक्कम चोरुन नेली असल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

काल पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी स्वर्ग पॅलेस ज्वेलर्सच्या मागील बाजूला असलेल्या शटरचे लॉक कापून शेटर उघडून आता प्रवेश केला आणि आत मधील काचा फोडून हाती लागेल तेवढे सोने चांदीचे दागिणे, ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोने तसेच चांदी आणि गल्ल्यातील १० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला आहे. अशी माहिती स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश जोरावलमल चौधरी यांनी दिली आहे. पोलिस गाडीचे सायरन ऐकून चोरटे पळाले.

ही जबरी चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. चोरटे आत शिरून चोरी करीत असतानाच आग्रारोडवर पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाचे सायरन ऐकू आल्याने चोरटे मागील गल्लीतून अंधाराचा फायदा उचलून पळून गेले. असेही स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, चोरटे मध्यरात्री उशिरा २ नंतर दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या शेटरचे कुलूप कडी तोडून आत शिरले आणि मांडणीतील दागिणे, सोने चोरत होते, २.४५ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाचे सायरन ऐकून चोरटे बाहेर पळाले. त्यामुळे हाती लागेल तेवढा ऐवज त्यांनी नेला. दुकानातील हिरे, खडे मात्र चोरांना मिळाले नाहीत. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, श्वान पथक, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, संजय गायकवाड, धनंजय मोरे, रवी राठोड, पंकज खैरमोडे, मयुस सोनवणे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे हवलदार पिंटू शिरसाठ, संदीप कढरे, शकील शेख, चालक संतोष घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. संबधित चोरटे दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले. असून लवकरच त्यांना जेरबंद करत चोरीचा उलगडा करणार असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :RobberyचोरीDhuleधुळे