शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी २०० शाळा दत्तक घेणार

By admin | Updated: November 1, 2015 20:49 IST

जळगाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्‘ात सर्वात जास्त मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण ज्या शाळांमध्ये आहे, अशा २०० शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणत्तापूर्ण शिक्षण दिले जाणाार आहे.

जळगाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्‘ात सर्वात जास्त मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण ज्या शाळांमध्ये आहे, अशा २०० शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणत्तापूर्ण शिक्षण दिले जाणाार आहे.
राज्यभरात जळगाव जिल्‘ाच्या शैक्षणिक गुणवत्तेत घरसण झाली आहे. त्यानुसार गुणवत्ता वाढीसाठी जि.प. प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच स्टॉर्म (सिस्टिम फॉर टिचर रिपोर्टिंग ॲण्ड मॉनिटरिंग) ही प्रणाली कार्यान्वीत केली. या प्रणालीत नोंद झालेल्या आकडेवारीनुसार जिल्‘ातील १८५३ शाळांपैकी २०० शाळांमध्ये मुला-मुलींचे गैरहजर राहण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले आहे.
२४२ अधिकारी घेणार दत्तक
जि.प. प्राथमिक शाळांमध्ये मुलांना आणण्यासाठी २४२ अधिकारी २०० शाळा दत्तक घेणार आहेत. त्यात १६४ केंद्र प्रमुख, ६४ विस्तार अधिकारी, १५ गटशिक्षणाधिकारी, ४ उपशिक्षणाधिकारी व २ शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी दिली.
शाळाबा‘ मुलांचे सर्वेक्षण करणार
ज्या अधिकार्‍यांनी जि.प. शाळा दत्तक घेतली आहे. त्या शाळेच्या परिसरात संबंधित अधिकारी शाळाबा‘ मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत. तसेच प्रत्येक कुटुंबाना भेटी देणार असून त्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस
जि.प. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी शाळेत राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यापार्श्वभमीवर दत्तक घेणार्‍या सर्व शाळांमध्ये सर्वात प्रथम गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे सूचित करण्यात आले आहे.