शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही परत येऊ नका

By admin | Updated: March 20, 2015 00:12 IST

पुणे: घरापासून दूर गेलेल्या मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा, अशी पालकांची भावना असते,परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विभागांमध्ये व विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इराकी विद्यार्थ्यांचे पालक त्यांना परत न येण्याचा सल्ला देत आहेत. आयएसआयएस दहशवादी संघटनेने इराकमध्ये सध्या बॉम्ब हल्ले सुरू केल्यामुळे इराणी नागरिकांचे जीवन अस्तव्यस्थ झाले आहे. अनेक इराकी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी भारतात सुरक्षित रहावे, असे इराकी विद्यार्थ्यांचे पालक सांगत त्यांना आहेत.

पुणे: घरापासून दूर गेलेल्या मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा, अशी पालकांची भावना असते,परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विभागांमध्ये व विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इराकी विद्यार्थ्यांचे पालक त्यांना परत न येण्याचा सल्ला देत आहेत. आयएसआयएस दहशवादी संघटनेने इराकमध्ये सध्या बॉम्ब हल्ले सुरू केल्यामुळे इराणी नागरिकांचे जीवन अस्तव्यस्थ झाले आहे. अनेक इराकी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी भारतात सुरक्षित रहावे, असे इराकी विद्यार्थ्यांचे पालक सांगत त्यांना आहेत.
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रात इंग्रजी भाषा अभ्यासक्रमास अमार बंडार या इराकी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या असून डिसेंबर 2014 मध्ये तो पुण्यात आला.त्यावेळी इराक मध्ये दहशवादी हल्ले होत नव्हते. परंतु,गेल्या काही महिन्यांंपासून त्यात वाढ झाली आहे. परिणामी इराकमधील अनेक नागरिक आयएसआयएस संघटनेच्या निशाण्यावर असलेल्या परिसरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जात आहेत. परंतु,काही नागरिक आयएसआयएसच्या बॉम्ब हल्ल्यांना बळी पडत आहेत.अशाच एका बॉम्ब हल्ल्यात अमार बंडार या विद्यार्थ्याचे दोन चुलत भाऊ मृत्यूमुखी पडले.
अमेद खलील आणि तहा अल तुर्की हे त्याचे दोन चुलत भाऊ अंबीर येथे राहत होते,आयएसआयएसचा हल्ला होणार असल्यामुळे इराकी मिलीटरीने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.परंतु, अमारचे चुलत भाऊ हिट या ठिकाणी जात असताना मृत्यूमुखी पडले. मिलिटरीने अमारच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवले होते.त्यामुळे गेले काही महिने त्याचा कुटुंबापासून संपर्क तुटला होता. परंतु,आता तो केवळ इंटरनेटच्या माध्यामातून आपल्या कुटुंनियांशी संपर्कात आहे.
अमार म्हणाला,माझ्या दोन चुलत भावांच्या मृत्यूची माहिती मला गेल्या आठवड्यात फेसबुकवरून कळाली.फेसबूकवर हिट न्यूस असे पेज तयार करण्यात आले असून या ठिकाणी घडणा-या घटनांची माहिती प्रसिध्द केली जात आहे.मोबाईलद्वारे पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे मी इंटरनेटच्या माध्यमातून पालकांशी संपर्क साधतो. दोन आठवड्यापूर्वी माझे पालकांशी बोलणे झाले त्यावेळी त्यांनी मला काळजीपोटी काहीही सांगितले नाही. परंतु,तु भारतातच रहा परत इराक मध्ये येऊ नको असेच ते मला सांगतात.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक विजय खरे म्हणाले,या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी विद्यापीठातर्फे घेतली जात आहे. तसेच कौटुंबिक आधार देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. पुण्यात सुरक्षित वाट असल्यामुळे येथेच राहणार असे इराकी विद्यार्थी सांगतात.