शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वायसीएमयुचा सावळा गोंधळ

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना पोस्टाने त्याच्या पत्त्यावर डीग्री सर्टीफिकेट पाठविण्यात आले.परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी (आ) या गावातील महादेव वसंतराव गुंड या विद्यार्थ्याच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पोस्टामार्फत मिळू शकले नाहीत.
महादेव गुंड या विद्यार्थ्याने सांगितले, कला शाखेची पदवी मी मे 2013 मध्ये प्राप्त केली.त्याचे पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी विद्यापीठाला अर्ज केला होता. खरेतर वायसीएमयुकडे मी माझा पुण्यातील पत्ता दिला होता.परंतु,परीक्षा विभागाने माझ्या गावाकडच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे पदवी प्रमाणपत्र पाठविले.परीक्षा विभागाकडून होत असलेल्या अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या किंवा विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला फेराव्या माराव्या लागत आहेत. मी स्वत:ने विभागीय केंद्रात जाऊन माझे प्रमाणपत्र घेवून आलो आहे.
वायसीएमयुच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ.अर्जुन घाटुळे यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.