शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी आयुक्तांना निवेदन : वडाळा उर्दू हायस्कूलमध्ये सोयीसुविधांची वानवा

By admin | Updated: August 12, 2016 01:32 IST

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.वडाळागावात एकाच इमारतीमध्ये सकाळ-दुपार सत्रात प्राथमिक शाळा भरते, तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये माध्यमिक विद्यालयाचे वर्ग भरत आहेत. सुरुवातीला शाळेची पटसंख्या कमी होती. त्यामुळे गैरसोय होत नव्हती मात्र मागील पाच वर्षांपासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सुमारे पावणे तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे संगणक कक्ष, प्रयोगशाळादेखील या ठिकाणी चालविता येणे अवघड झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इमारतीच्या गच्चीवर मंडप टाकून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह नसून पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. पाच वर्षांपासून सातत्याने उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. एकूणच गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंडळ सभापती व प्रशासनाधिकार्‍यांनी या शाळेत भेट देण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात शाळेच्या समस्या न सोडविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची एक प्रत प्रशासनधिकार्‍यांनाही देण्यात आली आहे.विद्यार्थीच करतात वर्गखोल्या स्वच्छउर्दू माध्यमिक विद्यालय व प्राथमिक उर्दू शाळेच्या एक ा सत्रामध्ये शिपाईच नसल्याने वर्गखोल्यांची तसेच शालेय आवाराची विद्यार्थ्यांनाच दोन दिवसाआड स्वच्छता करावी लागते. शाळेमध्ये शिपाई नियुक्त करण्याची प्रलंबित मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.