शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वेळुकर पुन्हा विद्यापीठात

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

वेळुकर पुन्हा विद्यापीठात

वेळुकर पुन्हा विद्यापीठात
प्रभारी कुलगुरुंना पदावरुन केले मुक्त
मुंबई :
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी कुलगुरुंनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. वेळुकरांना पदापासून दूर केल्याने त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी कुलगुरु नरेश चंद्र यांना वेळुकरांनी पदावरुन मुक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळुकर यांना पदावरुन दूर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच सवार्ेच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे आदेश येताच वेळुकर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानुसार गुरुवारी राज्यपालांनी वेळुकरांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी धुलिवंदनाची शासकीय सु˜ी असल्याने त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा घेतला.
सकाळी वेळुकर कार्यालयीन वेळेत विद्यापीठात दाखल झाले. महत्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांविषयी त्यांनी विद्यापीठातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच विद्यापीठाचे रखडलेले निकाल याविषयी सोमवार ९ मार्च रोजी परीक्षा कमिटीची बैठक आयोजित केली आहे. वेळुकर यांनी यापुर्वी प्रमाणेच पहिला दिवस सुरळीत पार पडला.
वेळुकर यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी कुलगुरु म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु नरेश चंद्र यांची नेमणूक करण्यात आली होती. वेळुकर पुन्हा विद्यापीठात रुजू झाल्याने त्यांनी आपल्या पदापासून नरेश चंद्र यांना मुक्त केले. त्यानुसार नरेश चंद्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.