शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षणावेळी एसटींवर अन्याय नाही

By admin | Updated: September 28, 2015 03:01 IST

विनय तेंडुलकर : लोकसंख्येचा विचार करून सरकारचा निर्णयपणजी : राज्यातील अकरा पालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करताना सरकारने अनुसूचित जमातींवर (एसटी) अन्याय केलेला नाही, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.तेंडुलकर म्हणाले, की सरकारने प्रभाग आरक्षण करताना कुठच्याच समाजावर अन्याय केलेला नाही. आम्ही कुणीच प्रभाग आरक्षण ...

विनय तेंडुलकर : लोकसंख्येचा विचार करून सरकारचा निर्णयपणजी : राज्यातील अकरा पालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करताना सरकारने अनुसूचित जमातींवर (एसटी) अन्याय केलेला नाही, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.तेंडुलकर म्हणाले, की सरकारने प्रभाग आरक्षण करताना कुठच्याच समाजावर अन्याय केलेला नाही. आम्ही कुणीच प्रभाग आरक्षण प्रक्रियेत हस्तक्षेपही केला नाही. भाजपच्या कार्यालयातून अधिकार्‍यांना कुणी फोन केला नाही किंवा आपणही फोन केला नाही. एसटी समाजाची लोकसंख्या ज्या पालिका क्षेत्रांमध्ये पुरेशी आहे, त्या पालिका क्षेत्रांमध्ये एसटींना आरक्षण दिले गेले. काँग्रेस सरकारच्या काळात मात्र लोकसंख्येचा किंचितही विचार न करता वा?ेल तिथे प्रभाग आरक्षित केले गेले होते.तेंडुलकर म्हणाले, की आरक्षणाच्या विषयावरून लोकांत मोठा असंतोष आहे, असे चित्र प्रसारमाध्यमांमधून विरोधी राजकीय पक्ष व काही वैफल्यग्रस्त नेते उगाच निर्माण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर पालिका निवडणुकीवेळी एकाही प्रभागात स्वत:च्या कार्यकर्त्यास जिंकून आणू शकणार नाही. पालिका प्रभागांची फेररचना व आरक्षण हे प्रथमच खूप चांगल्या प्रकारे झाले आहे. विद्यमान सरकारने प्रथमच अनुसूचित जातींना (एससी) म्हापसा, पेडणे व वास्को या पालिका क्षेत्रांमध्ये प्रभाग आरक्षित केले. तेंडुलकर म्हणाले, जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी एसटींना सरकारने 12 टक्के प्रभाग आरक्षित करून दिले होते. कारण, जिल्हा पंचायत क्षेत्रात येणार्‍या खेड्यापाड्यांमध्ये एसटी समाजातील अनेक लोक राहतात. शहरी भागात एसटी समाजातील लोक जास्त नाहीत. तेंडुलकर म्हणाले, की पालिका निवडणूक ही भाजपकडून विद्यमान सरकारच्या कामगिरीच्या आधारे व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच लढवली जाईल. आमच्या सरकारने केलेले काम आम्ही लोकांसमोर ठेवू. सर्व पालिका क्षेत्रांमध्ये बहुसंख्य भाजप कार्यकर्तेच निवडून येतील.(खास प्रतिनिधी)