शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By admin | Updated: February 29, 2016 22:53 IST

आज भाषा विषयाचा पेपर; सकाळी ११ वाजता परीक्षा

नाशिक : आज दि. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ९४,१६९ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे. विभागात सर्वांत कमी विद्यार्थी संख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक, कॅमेरा पथक आणि बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर पूर्णवेळ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पहिल्याच दिवशी भाषा या विषयाचा पेपर असून, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विभागीय सचिव मारवाडी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९४ हजार १६९ इतकी असून, धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या ३० हजार १७१, जळगाव जिल्ह्यातून ६३,५७९, तर नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या सर्वात कमी २० हजार ७२१ इतकी आहे. विभागातील एकूण विद्यार्थी संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे. विभागातील २,६१८ शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. विभागातील परीक्षा केंद्रांची संख्या ४१३ इतकी आहे, तर जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देतील. विभागात ५८ परीक्षकांची नेमणूक माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तसेच विभागात कुठेही कॉपीचा गैरप्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर असणार आहे.यंदा विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्र नमूद असल्याने विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा विभागीय मंडळाने केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असून, याबाबतची माहिती त्यांना शाळास्तरावरच देण्यात आली आहे. बारावी परीक्षेचा अनुभव लक्षात घेता विभागात चारही जिल्ह्यांमध्ये परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, भरारी पथकाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)