शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडे

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडे

शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडे
मुंबई :
विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकांतून शिकवले जाते, ती पुस्तके चुकीच्या लोकांनी लिहली आहेत. त्यामुळे मुलंाना चुकीचा इतिहास शिकविला जात असल्याने शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन संस्कृती, इतिहास शिकवावा, असे सल्ला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी शिक्षकांना दिला.
पाचवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात शनिवारी पार पडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री, गायिका फैयाज यांचा हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ समीक्षक मधु पाटील यांच्याहस्ते भालचंद्र नेमाडे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष संभाजी भगत, शिक्षण विभागाचे सहसचिव प्रकाश ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्कृती शिखरावर नाही, तळात घडते. गाळात उगवते. शिखरावर बर्फ असतो ऑक्सिजन नसतो. लेखकापेक्षा मी शिक्षक असल्याचा मला जास्त अभिमान असल्याचे, उद्गार यावेळी नेमाडे यांनी काढले. सध्या फक्त शिक्षकच नीट काम करतात. शिक्षकाची परंपरा उज्ज्वल असून ही परंपरा त्यांनी टिकवून ठेवली पाहिजे. त्यांनी राजकारणात पडू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना दिला. शिक्षकांना सन्मान मिळत नाही, अशा समाजात राहण्याची मला लाज वाटते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकांमध्ये वाढत असलेल्या इंग्रजी प्रेमावर त्यांनी टीका केली. ज्यांना मातृभाषा येत नाही, तो व्यक्ती कधीही पुढे गेलेला नाही. पालकांच्या इंग्रजी पोटी असणार्‍या अंधश्रध्देमुळे भाषेची दुरावस्था झालेली आहे. खरा महाराष्ट्र धर्म काय आहे, हे मुलांना कळू द्या, इंग्रजी ही कामापुरती असू द्या असे स्पष्ट करत त्यांनी शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी बोलताना प्रख्यात गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, शिक्षण हा सर्वात महत्वाचा विभाग असतानाही त्यासाठी देशात स्वतंत्र खाते नाही. शिक्षकांना सन्मान मिळत नाही. १0 लाखाच्या गाडीतून विद्यार्थी शाळेत येतो आणि शिक्षक बसमधून उतरतो, अशी वितरित परिस्थिती सध्या असल्याचे ते म्हणाले.