शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही

By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST

दिलीप कांबळे: जात पडताळणी दाखले मिळण्याबाबत अडचणी दूर करणार

दिलीप कांबळे: जात पडताळणी दाखले मिळण्याबाबत अडचणी दूर करणार
सोलापूर: विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) एकही विद्यार्थी फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करेल, असे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले़
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विनंतीवरुन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती़ यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव यु़सी़ लोणारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टि़वा़ करपते, सोलापूर विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक इंदापुरे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष ॲड़ श्रीनिवास क्यातम, सरचिटणीस दशरथ गोप, मुंबई प्रांत पद्मशाली संघमचे अध्यक्ष सैवी रामुलू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़
राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, एसबीसीतील विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत़ विद्यार्थ्यांचे फ्रीशिप तसेच शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम देण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या प्रवर्गातील एकही विद्यार्थी फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करेल़ एसबीसीसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी यावेळी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली़ नोकरदार मंडळींना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची गणना करताना वेतनापासूनचे उत्पन्न वगळून ६ लाख मर्यादेत असून देखील जिल्हा प्रशासनाकडून चुकीचा आधार घेतला जात असल्याचे एसबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील, असे कांबळे म्हणाले़
फोटो ओळी़़़ ०६ एचआर १६
एसबीसीचे विविध मागण्यांबाबतचे निवेदन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे देताना विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक इंदापुरे, डावीकडून दशरथ गोप, सुरेश फलमारी, श्रीनिवास क्यातम, सैवी रामुलू, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पांडुूरंग दिड्डी आदी.